आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

चिंचवडच्या आमदाराने केली महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा

नितीन देशपांडे   84   03-01-2025 12:00:23

पिंपरी-चिंचवड

विधानसभा निवडणुकीतील या विजयानंतर महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांना गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.

अशात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची माहिती दिली आहे.

आमदार जगताप यांच्या या विधानानंतर महायुतीतील मित्रपक्ष नाराज होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा (अजित पवार) बालेकिल्ला मानला जायचा. पण, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान राज्यात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाच्या हातात आहे.

भाजप नेते व शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रशासनाच्या माध्यमातून जी काही जनतेची कामे थांबली आहेत, म्हणून आम्ही सर्वजण महानगर पालिकेतील माजी नगरसदस्य शहरातील पाणी, रस्ते, विकास आणि इतर कामांसाठी आयुक्तांकडे आलो होतो. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, शहरातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा मार्ग सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, पाण्याचा आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही गेलो होते. या बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची कामे करतात. सध्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमच्या या नगरसदस्यांकडे लोक येतात. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही याठिकाणी आलो आहोत, असे मत शंकर जगताप यांनी व्यक्त केले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.