Beed (बीड)
मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सात आरोपींचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. यातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र इतर तीन आरोपी अजून फरार आहे. सरपंच हत्येतील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे.
वरील फोटोमध्ये असलेले व्यक्ती आरोपी असून त्यांच्यावर खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. हत्या झाल्यापासून हे तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलाकडून चालू आहेत. या आरोपींविषयी ठाव ठिकाणा कोणास माहिती असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.