पुणे:
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांना वर्षाला 36 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल. विशेष म्हणजे विना परीक्षा म्हणजेच मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्याच्या अधिकृत वेबसाइट www.nabard.org ला भेट द्या आणि संपूर्ण माहिती तपासा. त्यानंतर अर्ज करा.
कोणत्या पदांवर रिक्त जागा?
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने एकूण 10 विशेष पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ETL विकसक, वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक, व्यवसाय विश्लेषक, UI/UX विकसक, विशेषज्ञ डेटा व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापक ऍप्लिकेशन मॅनेजमेंट, वरिष्ठ विश्लेषक या प्रत्येकी एका पदासाठी रिक्त जागा आहेत, तर डेटा सायंटिस्टच्या दोन पदांची भरती करायची आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 डिसेंबर 2024 पासून सुरू होते, त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 5 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.