आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

वाल्मीक कराड सरकारचा जावई ; हत्तेखोराला सर्व व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार या आमदाराचा निशाणा

शरद लाटे  103   02-01-2025 11:01:12

बीड 

बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केज न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी रात्री उशीरा त्याला न्यायालयात आणण्यात आले.

कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. तीन आठवड्यांपासून तो फरार होता. सीआयडीकडून आता त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन २३ दिवस उलटले आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.

#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.