आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होण्याची शक्यता; या नेत्याचे वक्तव्य

शिंदे राम   9   02-01-2025 10:46:43

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले.

यादरम्यान काँग्रेसचे नेत विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचे बीड पोलीस स्थानकात लाड केले जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात असल्याच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वडेट्टीवार म्हणाले की, 'पोलिस स्टेशनध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलीसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे'.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.