आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बीड

संतोष देशमुख यांची हत्या होवून आज २२ दिवस झाले आहेत, परंतु अद्यापही या हत्येच्या कटामध्ये सामील असणाऱ्या आरोपींना पोलिस पकडू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी जलसमाधी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.तसेच हत्येच्या मागील मास्टर माईंड वाल्मीक कराड या

शरद लाटे  524   01-01-2025 13:02:30

बीड 

संतोष देशमुख यांची हत्या होवून आज २२ दिवस झाले आहेत, परंतु अद्यापही या हत्येच्या कटामध्ये सामील असणाऱ्या आरोपींना पोलिस पकडू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी जलसमाधी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.तसेच हत्येच्या मागील मास्टर माईंड वाल्मीक कराड याच्यावर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करावा ही त्यांची मागणी आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (२६ वर्ष) (रा. टाकळी ता. केज) आणि त्याचे साथीदार कृष्णा शामराव आंधळे (२७ वर्ष) मैंदवाडी (ता. धारूर), सुधीर सांगळे (वर्ष) रा. टाकळी ता. केज) हे तीन आरोपी फरार आहेत.यांना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश आलेले आहे.

गावकऱ्यांनी दि. १ जानेवारी रोजी सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचे निर्णय घेतला आहे. आज मस्साजोगच्या तलावात महिला व पुरुष उतरले असून जलसमाधी आंदोलन सुरू झाले आहे. संतप्त महिला आणि पुरुष यांनी रोष व्यक्त करीत पाण्यात उतरले आहेत. यावर लवकरच प्रशासनाने आरोपींना अटक करुन गुन्हा नोंद करावा अन्यथा जलसमाधी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.