आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 हिंगोली

नवं वर्षांत पालिका, झेडपी, ग्रामपंचायती, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा

नितीन देशपांडे   578   01-01-2025 10:44:11

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा, पालिका, झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच ग्रामपंचायती आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका कोणत्याहीक्षणी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात विविध निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. राज्य सरकारनं राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती दिली होती. त्याची मुदत संपत असल्यानं नव्या वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्यानं, निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागानं निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत.

राज्यातील सहकारी साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समित्या, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, प्रशासक, प्रशासक मंडळ नियुक्त केलेल्या सहकारी संस्था, हंगाम समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्था यांच्या निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. त्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यात येणार नाहीत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.