पुणे:
मागील 21 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड याला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिवसांची 15 दिवसांची (ता.
14 जानेवारी पर्यंत) सीआयडी कोठडी सुनावली.
यावर मंगळवारी (ता. 31) रात्री उशिरापर्यंत सुनावणी चालली. दरम्यान, सरकारी वकिलांनी ऐनवेळी वैयक्तिक कारण देत या प्रकरणातून माघार घेतली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून आणि पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मगितल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या दोन प्रकरणासह पावनचक्कीवरील वॉचमनला मारहाण प्रकरणी अट्रोसिटी व पावनचक्कीवर भांडण असे इतर दोन गुन्हे देखील दाखल आहेत. या चारही प्रकरणांचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.
अगोदर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणले. वाल्मिक कराडला केजला आणणार असल्याने त्याच्या समर्थकांनी या परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता. न्यायाधीश एस. वाय. पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सीआयडीचे वकील ऍड. जे. बी. शिंदे यांनी 15 दिवसांची कोठडी मागितली. न्यायाधीश श्री. पावसकर यांनी 15 दिवसांची कोठडी सुनावली. वाल्मिक कराड याच्याकडून ऍड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली.