पुणे :: -
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. याप्रकरणातील काही आरोपी आणि वाल्मिक कराड हे अद्याप फरार आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 22 दिवस उलटूनही अद्याप पोलिसांना वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना पकडण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता संतोष देशमुख हत्याप्रकरण सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस हे मंगळवारी मुंबईत येणार आहेत. सुरेश धस हे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.