आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला;

नितीन देशपांडे   68   30-12-2024 08:34:44

पुणे :: - मस्साजोग सरंपच हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी या दोन गुन्ह्यांतील आरोपी वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सीआयडीने फ्रीज केले आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे नऊ पथके देशभरात तपास करत आहेत.

म्हणून वाल्मिक कराड येणार शरण

वाल्मिक कराडसहीत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठवण्यात आली. त्यामुळेच कराड फार दूर जाऊ शकत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टसंदर्भातही कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराडकडे पासपोर्टच नसल्याने तो देशाबाहेरही जाऊ शकत नाही, असे समजते. म्हणूनच पुढील काही तासांमध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.