आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 लातूर

1 गुंठा जमीनीची खरेदी विक्री करणे शक्य; हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

नितीन देशपांडे   403   28-12-2024 23:31:39

राम कुलकर्णी परभणी 

tukda bandi kayda 2024 नव्या सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे विविध विधेयके आणि निर्णय मंजूर करण्यात आले. त्यापैकी एक  सर्वात मोठा निर्णय म्हणजे तुकडेबंदी कायद्यासंदर्भातील निर्णय. तो म्हणजे यापुढे शेतकरी असो किंवा कोणीही त्यांना 1 गुंठा जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे. या आधी तुकडेबंदी कायद्यांतर्गत तसे करण्यास राज्य शासनातर्फे बंदी घालण्यात आली होती. परंतू महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकारच्या हिवाळी अधिवेशनात यांदर्भात निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि त्यासंदर्भात आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

जमिनीचे छोटे छोटे भाग केल्याने पिकाची उत्पादकता नष्ट होते आणि त्यामुळे नुकसान होते असे असल्याने जमीनीचे छोटे छोटे भाग खरेदी किंवा विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतू एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी विहिर बांधायची असेल किंवा शेतरस्ता काढायचा असेल तर त कमी प्रमाणात जमीन खरेदी करुन ही कामे करता येत नसल्याने शेतकऱ्याची अडचण होत असे

तुकडेबंदी कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारे काही बदल केले आणि त्यानुसार शासनाने संबंधीत शासन निर्णय देखील काढला आहे. खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही तो शासन निर्णय पाहू शकता.

  • विहिर बांधणे शक्य

हिवाळी अधिवेशनातील विधेयकामुळे शेतकऱ्यांना यापुढे विहिर बांधण्यासाठी 1 ते 2 गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी करता येणार आहे.

  • शेततळ्यासाठी जमीन मिळवणे शक्य

तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करुन महाराष्ट्र राज्य हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयानुसार 1 गुंठा जमीन यापुढे खरेदी विक्री करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे शेततळ्यांसाठी जमीन मिळवणे शक्य झाले आहे. tukda bandi kayda 2024

  • शेतरस्त्यासाठी जमीन मिळवणे शक्य

 

नव्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना शेतरस्त्यासाठी लागणारी 1 गुंठा जमीन खरेदी करता येणांर आहे. याआधी तसे करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

  • घरकुल योजनेमार्फत घर बांधता येणार

एखाद्या व्यक्तीस घरकुल योजनेमार्फत घर बांधायचे असेल आणि त्याच्याकडे जमीन नसेल तर या योजनेअंतरर्गत ती व्यक्ती घरासाठी लागणारी 1 ते 2 गुंठे जमीन खरेदी करु शकणार आहे. कारण विधेयकात तसे नमूद करण्यात आले आहे की शासकीय योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी कमी प्रमाणात जमीन खरेदी करणे शक्य आहे. 

आता मात्र, बाजारमूल्याच्या ५ टक्के शुल्क भरून तुम्ही १ गुंठ्याची खरेदी-विक्री करू शकता. याबाबत यापूर्वी एक अद्यादेश काढण्यात आलेला होता. त्याचे अधिनियमात रुपांतर करण्यासाठी विविध मंत्र्यांनी यांनी विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये विधेयक सादर केले आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यामार्फत ती मंजूर झाले आहे. शासकीय नियमांनुसार, घर बांधकाम, विहिरी खोदकाम, आणि शेत रस्त्यासाठी केवळ १, २, ३, ४, ५ गुंठ्याची खरेदी-विक्री करता येईल. यामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.