सिंहगड रोड प्रतिनिधी ::-
खडकवासला : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करत असतात. त्यासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांची रात्रभर करडी नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या इसमांवर कारवाईचाही बडगा उगारला जाणार आहे.
खडकवासला ,सिंहगड , पानशेत रोड शहरी वस्ती आणि डोंगरी भागात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा करत असतात. या परिसरात मोठी गर्दी उसळलेली असते. रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर हॉटेल आणि बारमध्येही अनेक पार्ट्या आयोजित केल्या जातात. सोसायट्यांचे आवार आणि गच्चीवर पार्ट्या झडत असतात. यंदा सरकारने आस्थापनांना काय परवानगी दिलेली आहे. हे नागरिकांनी व पर्यटकांनी समजून घेवून आमलवजावणी करणे गरजेचे आहे .
या परिसरांत स्वागतासाठी सामान्य नागरिक व महिलादेखील मोठया प्रमाणात घराबाहेर आलेल्या असतात. मात्र काही मद्यपी व्यक्ती अशावेळी मद्यपान करुन वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणे अशाप्रकारचे कृत्य करतांना आढळून येतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरता पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या मार्गदशनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. टवाळखोरी करणारे, मद्यपान करुन वाहन चालवणारे तसेच बेदरकापणे वाहन चालवणार्या व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी हवेली ग्रामीण भागात वाहतूक शाखेकडून व पोलीस ठाणे हवेली यांचेकडून ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. जो कोणी नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांची करडी नजर राहून महत्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे देखील संशयितांवर पाळत ठेवणार आहेत. सदर ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार,होमगार्ड महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान रात्रभर कडक बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहेत.
विनापरवाना पार्टीवर पोलिसांचा वॉच ; मद्यपींवरही करडी नजर
सिंहगड परिसर नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. हॉटेल्स, ढाब्यांची रंगरंगोटी सुरू असून, विद्युत रोशणाईही केली जात आहे. कोणताही अनुचित व गैरप्रकार घडू नये, यासाठी हवेली ग्रामीण पोलिसांनी परिसरावर करडी नजर आसणार आहे. बंदोबस्तासाठी सशस्त्र पोलिसांसह कमांडो पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या परिसरात लक्ष ठेवून आसणार आहेत.
विना परवाना पार्टी, समारंभ आयोजित करणाऱ्या हॉटेल्स, ढाबे, फार्म हाऊस तसेच मोटेल्सवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालविणे, धिंगाणे घालणे, सार्वजनिक ठिकाणे अश्लिल चाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मद्य तपासणी यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे.
३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत कडेकोट सुरक्षा व सलग ७२ तास जागता पाहरा व ठेवून करडी नजर सिंहगड-खडकवासलात ठेवण्याचे, नियोजन पोलिस प्रशासनाने केले आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतप्रसंगी नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करतांना कायदयाचे पालन करावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता दक्षता घ्यावी. अडचणीच्या प्रसंगी गरज भासल्यास तात्काळ मदतीसाठी हवेली पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा,
– सचिन वांगडे ,पोलीस निरिक्षक हवेली पोलीस ठाणे