विशाल भालेराव - Pune
पुणे – पुण्यातील कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर १३ येथे एका महार वतनाच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम उभे केले गेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हकीकत अशी की, कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर १३, माने हॉस्पिटल समोर ऊझेर नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे बांधकाम चालू केल्याची तक्रार आहे. सदरील बांधकाम व्यावसायिकाने ज्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम चालू ठेवले आहे ती जागा महार वतनाची असल्याची काही स्थानिक लोकांनी दिली आहे.
पुणे महानगर पालिकेत या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, पालिकेने सदरील बेकायदेशीर बांधकामाला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. तर पालिकेने नोटीस देऊन सुध्दा त्या ऊझेर नावाच्या बांधकाम करणाऱ्याने बांधकाम चालू ठेवलेले आहे.
विषेश म्हणजे ज्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम उभे केले जात आहे. ती जागा महार वतनाची असताना देखील, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी निवांतपणे झोपा काढत आहेत.
” पुणे महानगर पालिकेने तात्काळ बेकायदेशीर बांधकाम थांबवावे.
ऊझेर नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने सुरू ठेवले बेकायदेशीर बांधकामावर पालिकेने नोटीसा बजावून देखील सदरील इसम हा धूमधडाक्यात काम चालू ठेवले आहे. सदरील जागा ही महार वतनाची असल्याने, कोंढवा पोलिसांच्या मदतीने पालिकेने तात्काळ वर्क स्टॉप नोटीस द्यावी आणि काम लगेचच जमीनदोस्त करावे. जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही.
“पुणे जिल्हाधिकारी यांच्या परवानगी विनाच महार वतनाच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम
महार वतन जमिनीबाबत परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांना आहेत. जमीन पूनर्प्रदान केलेल्या खातेदाराना जमिनीची विक्री, बक्षीसपत्र, खरेदीखत, भाडेपटटा इत्यादी कारणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु सर्वे नंबर १३ मध्ये अशा कोणत्याही प्रकारची परवानगी व शासनाकडे नजराना भरण्यात आलेला नाही?