आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 औरंगाबाद

धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका, शिंदेसेनेच्या मंत्र्याची मागणी

शरद लाटे  9   27-12-2024 20:15:38

अजय खरे संभाजीनगर 

बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे. महायुतीत देखील खटके उडाल्याचं चित्र आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत.

महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना (Dhananjay Munde) बीडचे पालकमंत्रिपद देण्यास विरोध आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर आहेत. सध्या तर त्यांना महायुतीतूनच विरोध होताना (Beed Sarpanch Murder Case) दिसतोय. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देवू नका, अशी थेट मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडलीय. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

संजय शिरसाट म्हणाले की, राज्यातील सरपंच खतरे में है, अशातला भाग नाहीये. पण सरपंचाने जबाबादारी चांगली केली, तर दुश्मन उभे राहतात. सरपंच हत्या प्रकरणानंतर त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती संपूर्ण जिल्ह्यात दिसली. कल्याणमध्ये देखील काल आमदाराच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आलाय. याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका. तसेच धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका, अशी मागणी देखील संजय शिरसाट यांनी केलीय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.