आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अमरावती

एम.एड, एम.पी.एड, एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीला आजपासून सुरुवात

शिंदे राम   109   27-12-2024 15:54:13

प्रशांत कापरे :- अमरावती  

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीच्या (सीईटी) नोंदणी प्रक्रिया २५ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. एम.एड, एम.पी.एड, एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

विद्यार्थी हित लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहेत. १६ मार्च ते २७ एप्रिल २०२५ या ४५ दिवसांच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या सर्वच परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार एम.एड., एम.पी.एड., एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला २५ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली असून, २५ जानेवारीपर्यंतच विद्यार्थ्यांना आपला अर्ज भरता येणार आहे. उर्वरित अभ्यासक्रमच्या परीक्षासाठी नोंदणी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.