मुंबई :: - रोहिणी पराठे
देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. आज 23 डिसेंबर रोजी देखील यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मार्चमध्ये शेवटचा बदल केला होता, मात्र
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने या आठवड्यात संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात CNG च्या किमतींमध्ये प्रति किलो एक रुपयाने आणखी वाढ असल्याची घोषणा केली. एमजीएलच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 24 नोव्हेंबरला किलोमागे 2 रुपयांनी वाढ केली होती. आता पंपावर सीएनजीसाठी प्रति किलोमागे 78 रुपये मोजावे लागणार आहेत, तर पाइप गॅसची किंमत 48 रुपये प्रति युनिट याच दराने सुरू आहे.
ऑटो, टॅक्सी, खासगी कार या CNG वर अवलंबून आहेत, पेट्रोल डिझेलपेक्षा CNG अधिक प्रमाणात वापरला जात आहे. सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने, ऑटो युनियन किमान भाड्यात 3 रुपये वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनचे थॅम्पी कुरियन यांनी दिलेल्या माहितीनुसार युनियन सरकारकडे याबाबत प्रस्ताव सादर करणार आहे. एमएमआरमध्ये 23 रुपयांवरून 26 रुपये करावा असं प्रस्तावात म्हटलं आहे.