निगडी प्रतिनिधी - : रविवारी (२२ डिसेंबर रोजी) काळेवाडीतील पवनानगर येथे घडला. याप्रकरणी अनुप भोसले याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. तर, अक्षय भोसले, प्रणव गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेत सराईत गुन्हेगार प्रशांत भानुदास दिघे (वय ३२, रा. काळेवाडी) याचाही सहभाग असल्याचे फिर्यादीचे म्हणणे होते. मात्र, फौजदार सचिन चव्हाण यांनी प्रशांत दिघे याचे नाव गुन्ह्यात घेतले नाही. सत्ताधारी महायुतीतील शहरातील एका बड्यानेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळण्यात आले होते.
याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
तो बडानेता कोण समाज माध्यमात चर्चा
पोलिसांवर दबाव आणणारा तो लोकप्रतिनिधी कोण अशी देखील शहरात सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे, पिंपरी चिंचवड चा बीड करायचा आहे का स्थानिक गुंडांना आश्रय देणाऱ्या लोकप्रतिनिधीचे नाव जाहीर करा अशी मागणी देखील होताना दिसून येत आहे लोकप्रतिनिधींना गुंडांना आश्रय कमी करावा त्याचा त्रास सर्वाधिक सर्वसामान्य नागरिकांना होतो, पिंपरी चिंचवडच्या जनतेने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे,
घटनास्थळावरील नागरिकांकडे पोलीसांनी चौकशी केली.परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. संभाषण ध्वनिमुद्रित (कॉल रेकॉर्डिंग) तपासण्यात आले. त्यामध्ये जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेत गुन्हेगार प्रशांत याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर तात्काळ प्रशांत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. प्रशांत हा पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यासारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत चव्हाण यांना निलंबीत करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चौबे यांनी दिले.