बीड प्रतिनिधी -- राज्यामध्ये सध्या बीड हत्या व परभणी हिंसाचार प्रकरणावरुन वातावरण तापले आहे.
राज्यातील या गुन्हेगारींच्या घटनेवर नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यांना अगदी शारिरीक त्रास देऊन त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे हे प्रकरण देशभर गाजत आहे. यावर विधान परिषदेच्या आमदार व मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्ह्यात जातीय समीकरण करण्यामागे प्रत्येक राजकारणाचा हात यामागे निश्चित आहे गाव खेड्यातील लोकांना जातिवाद करून वेड्यात काढण्याचे काम जिल्ह्यातील प्रत्येकाने केलेले आहेत वाल्मीक कराड यांनीच लक्ष्मण हाके यांना आर्थिक पाठबळ देत जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले व पंकजा मुंडे यांनी थेट सावरगाव या ठिकाणी भगवान भक्ती गडावर आणत जातीयवाद पसरवला हे देखील नाकारता येणार नाही?, महापौर भाजपचा होईल केवळ एकट्या धनंजय मुंडे यांना याच्यात दोष देता येणार नाही
प्रत्येकाने जातीयवाद नष्ट करून बीड जिल्हा पुढे नेण्याचे काम केले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातील घटकांनी यासाठी पुढे येण्याचे काम करावे लागणार आहे
या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप व निषेध व्यक्त करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेतील. फडणवीस हे माझ्या त्या लेकराला नक्की न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता. तो माझ्यासोबत काम करत होता. माझ्यासोबत त्याने चांगला सरपंच म्हणून काम केलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे," असे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.