भंडारा प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरे असल्याचा उठसूट दावा करणं अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर तुलसी पिठाधीश्वेर स्वामी रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत यांना असे बोलण्याचा अधिकार नाही, असा संताप व्यक्त केला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामभद्राचार्य म्हणाले, मोहन भागवत हे एका संघटनेचे प्रमुख आहेत. ते हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. त्यांना संतांना निर्देश देण्याचा अधिकार नाही. जिथे जिथे आमची मंदिरे आहेत ती आम्हाला हवीच आहेत.
रामभद्राचार्य म्हणाले, मंदिरे आणि मशिदी आता सोडून द्याव्यात असे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही. जिथे जिथे आपल्या मंदिरे आहेत त्यात सत्यता आहे तिथेच आपण शोधत आहोत. काही जण राम मंदिराच्या उभारणीनंतर हिंदूचे नेता बनू पाहत आहेत, असेही ते (मोहन भागवत) म्हणाले. कोण नेता बनू पाहात आहे? असा सवाल देखील रामभद्राचार्य यांनी विचारला
ते म्हटले धर्माची चुकीची व्याख्या केली जात आहे. धर्माची व्याख्या समजावणारे ते कोण आहेत? धर्माचार्य, जगतगुरु आम्ही आहोत.आमच्या पेक्षा त्यांना अधिक धर्म थोडाच माहिती आहे. त्यांनी असे वक्तव्य करू नये. ते एका संघटनेचे प्रमुख आहेत. हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत.’, असे देखील रामभद्राचार्य म्हणाले.