राहुल देशपांडे :: मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास आणि अनुभवी खेळाडू विराट कोहली यांच्यात बाचाबाची पाहिला मिळाली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.#INDvsAUS
ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या षटकानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील वातावरण तापले. सॅम कॉन्स्टास आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला. खेळपट्टीच्या मध्यभागी कोहली आणि कोन्स्टॅस यांची टक्कर झाली. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजासह पंचांना हस्तक्षेप करावा लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.