आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 औरंगाबाद

थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू

शिंदे राम   8   26-12-2024 09:54:11

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नवीन वर्षाची सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी करत आहे. या दिवशी दारू पिणार्‍यांची संख्या अधिक असते. अशा मद्यप्रेमींना आता खुशखबर दिली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन दणक्यात होणार आहे.

अनेकजण दारू पिऊन सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करतात. या काळात दारूची सर्वाधिक विक्री होते. थर्टी फर्स्टच्या दिवशी दारू पहाटेपर्यंत उपलब्ध होणार आहे. बीअर/वाईन विक्री करणार्‍या दुकानांना 1 वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार दारू दुकानांची वेळ 31 डिसेंबरच्या दिवशी वाढवण्यात आली आहे. रात्री 1 वाजेपर्यंत दारूची दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवानगीनुसार दारू दुकाने सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

दरम्यान, थर्टी फर्स्टच्या दिवशी रिर्साट, हॉटेल आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांना एक दिवशीय परवाना घेणे बंधनकारक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हा परवाना दिला जातो. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल्स, लॉन तसेच फार्म हाउस अशा ठिकाणी पार्ट्यांचे नियोजन केले जाते. अशा पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात दारूचा वापर केला जातो. परंतू ती दारू बनावट दारू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बनावट दारूची विक्री होणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी आठ पथके स्थापन केली आहेत.

गैरप्रकारावर पोलिसांची नजर
थर्टी फर्स्टच्या दिवशी सर्वजण सेलिब्रेशन करतात. पण या काळात बंदोबस्ताला असणार्‍या पोलिसांची दमछाक होते. राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवल्याने पोलिसांची कसरत होणार आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहे. तसेच अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आठ पथके तैनात राहणार आहे. रात्रीच्या गस्त, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.