आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

पुण्याच्या लोणीकंदमध्ये बीड पोलिसांचा थरार गोळीबारातले तीन आरोपी अटक

नितीन देशपांडे   9   24-12-2024 14:16:03

Pune बीड (Beed): शहरातील इमामपूर रोड गोळीबार करून दहशत माजवणारे गुन्हेगार गेल्या आठ दिवसांपासून फरार होते. अखेर गुप्त बातमीदाराच्या मार्फत संबंधित गुन्हेगार पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत लपून बसलेले असल्याची माहिती बीडच्या स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाला झाल्यानंतर या विभागाची एक टीम काल सायंकाळी लोणीकंद येथे पोहचली. तेथील त्या इमारतीला पोलिसांनी वेढा टाकला. मात्र लपून बसलेल्या आठवले आणि क्षीरसागर या दोघांना पोलिस आल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या इमारतीतून पळ काढला. तब्बल एक ते दीड तास लोणीकंद परिसरात चोर-पोलिसांचा खेळ चालू होता. सरशेवटी सिनेस्टाईल पद्धतीने बीड पोलिसांनी अक्षय आठवले, मनिष क्षीरसागर या दोन आरोपींच्या मुसक्या बांधल्या तर बीडमधून ओंकार सवाई याला ताब्यात घेतले.

बीड येथील विश्‍वास दादाराव डोंगरे यांच्या घरावर जात अक्षय आठवले, मनिष क्षीरसागर, ओंकार सवाईसह काहींनी दहशत माजवत दि.12 डिसेंबर रोजी अवैध पिस्टलातून अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात डोंगरे यांच्या पोटात गोळी लागली आणि ते जखमी झाले. आरोपी हे गोळीबार करून पसार झाले. बीड जिल्ह्यात माफियागिरी आणि गुन्हेगारी प्रचंड वाढलीय. याचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशनामध्ये आणि संसदीय अधिवेशनात उमटताना दिसून आले. मात्र पोलिसांना या गोळीबारातल्या आरोपींना गेल्या सहा दिवसांपासून पकडता आले नव्हते तेव्हा पोलिसांविषयी जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात होता. काल स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांना गुप्त बातमीदाराद्वारे गोळीबार प्रकरणातले अक्षय आठवले, मनिष क्षीरसागर हे दोन गुंड पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरातील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत लपून बसलेले असल्याची माहिती मिळाली. काल सायंकाळच्या दरम्यान बीड पोलीस व तेथील स्थानीक पोलिसांनी सहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम चालू असलेल्या इमारतीला वेढा टाकला. लपून बसलेल्या आरोपींना पोलीस आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पाठलाग करत पकडले. तब्बल एक तास या परिसरामध्ये चोर-पोलिसांचा खेळ रंगला होता. सिनेस्टाईल पाठलाग करून अक्षय आठवले आणि मनिष क्षीरसागर या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तर इकडे बीहमध्येही रात्रीच ओंकार सवाई यालाही ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी या तिघांचे मेडिकल करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही यशस्वी कारवाई स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पीआय उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरकुटे, पीएसआय विघ्ने, पो.हवालदार मुंजाळ, विकास वाघमारे, राहुल शिंदे यांनी केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.