आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सतीश वाघ हत्या प्रकरण

शिंदे राम   8   24-12-2024 12:05:38

हडपसर प्रतिनिधी :: भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर(Mla Yogesh Tilakar)  यांच्या मामाचे अपहरण गेल्या काही दिवसापूर्वी झाले व त्यांचा मृतदेह आढळून आला त्याच प्रकरणात

सतीश वाघ यांचा खून झाल्यापासून पोलीस जाधव याचा शोध घेत होते. सुरुवातीला पवन शर्मा (रा. धुळे ) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी ) या दोघांना ताब्यात घेतले होते. आता जाधव याला अटक केली आहे.

सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हे शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय देखील आहे. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झालं होतं. पुण्यापासून सुमारे 34 किलोमीटरवर असलेल्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात त्यांचा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.