आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे ग्रामीण

Ajit Pawar पर्यंतच्या जीवनात संतोष देशमुख इतकी वाईट केस कधीच बघितली नाही उपमुख्यमंत्री अजित पवार

शिंदे राम   7   22-12-2024 20:57:51

बारामती ::- मी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो. ते म्हणाले पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही..एखाद्या प्राण्याला मारताना देखील आपण विचार करतो

या शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अशा घटनेमुळे शरमेन मान खाली जाते", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची क्रुरतेने हत्या करण्यात आली. तिथे मी त्यांच्या मुलीला, पत्नीला आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी मी गेलो होत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलं. काहीही झालं तरी या मागे जो मास्टरमाईंड असेल त्याला सोडलं जाणार नाही. कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही. कोणाला भयभीतपणे जगतोय असं कोणलाही वाटता कामा नये. मी आज देखील तुम्हाला सांगतो आम्ही तिघांनीही यामध्ये लक्ष घातलेलं आहे.

बारामतीत देखील अनेक घटना घडत असतात, त्यामुळे आई वडिलांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.