आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

धनंजय मुंडेला सरकारमधून हटवा अन्यथा पुढच्या निवडणुका जड जातील

नितीन देशपांडे   7   22-12-2024 13:43:23

बारामती (Pune)  संतोष देशमुख हत्येसाठी दोषी असलेल्या सर्वांवर कडक कायदेशीर करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे, तपासामध्ये जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.

संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्याचा सर्वात मोठा अडसर आपल्या पक्षाचे आमदार व मंत्री धनंजय मुंडे यांना होत होता, त्यामुळे त्यांनी इतर गुंडांमार्फत म्हणजेच वाल्मीक कराड व इतर गुंडामार्फत ही हत्या केल्याचे दिसून येत आहे, धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून हटवावे अन्यथा पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जड जातील असा सुचक इशारा देखील असे अजितदादा यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ नये, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. पण सर्वांचा विरोध डावलून अजित पवारांनी मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.