पुणे (Pune) :: बाणेर भागातील अनेक वर्षापासून वास्तव्याला असणारे श्री मोहन येडप्पा कसबे यांची कन्या तृप्ती हिचा विवाह उद्या 22 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे,
कसबे यांचे कुटुंब मूळ मराठवाड्यातील तुळजापूर जवळील काष्टी येथील आहे, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आपला उदरनिर्वाह पुणे येथे छोटे मोठे काम करत ते करत असतात मात्र अचानकपणे मुलीचे लग्न देखील ठरले परिस्थिती देखील हलक्याची याची माहिती कसबे कुटुंबियांनी कळमकर यांना दिली त्यानंतर नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर यांनी व सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे नेते गणेश कळमकर यांनी आपल्या स्वखर्चातून कन्येला लग्नाची भांडी, साडी, इत्यादी आवश्यक साहित्य दिले, यावेळी तृप्तीच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले,
कसबे कुटुंबीयांना एक हात मदतीचा मिळाल्यामुळे चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता काम केले तरच खायला मिळते अशा या परिस्थितीत कसबे कुटुंबांना कुटुंब उपयोगी भांडी देत धीर देण्याचा काम माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर यांच्या वतीने करण्यात आले