आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 ठाणे

Thane Kalyan : मराठी माणसे घाणेरडी आहात, गाडीवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या अधिकाऱ्याचा प्रताप

शिंदे राम   130   20-12-2024 07:29:57

ठाणे जिल्हा :: घरात धूप अगरबत्ती लावून धूर केल्यावरून शुक्ला व कळविकट्टे यांच्यात वाद झाला. शुक्ला याने मराठी माणसांचा अपमान होईल या शब्दांत भांडण केले. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या देशमुख यांनी मराठी माणसांना अपमानित करू नका असे सांगितले.

मराठी तरुणाचे डोके फोडून महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत अखिलेश शुक्ला या माथेफिरू अधिकाऱयाची मजल गेली. कहर म्हणजे मी मंत्रालयात काम करतो, रोज 56 मराठी माझ्यासमोर झाडू मारतात, पोलीस मला घाबरतात, मुख्यमंत्री कार्यालयात एक फोन केला तर तुमच्या मराठीपणाची हवा निघून जाईल, अशी गरळ ओकणाऱ्या अखिलेश शुक्लावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी परस्परविरोधी फिर्याद नोंद केल्याने कल्याणमध्ये संताप व्यक्त होत आहे.

तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, मटण, मच्छी खाता असे अद्वातद्वा बरळू लागला. यावेळी देशमुख कुटुंबाने हस्तक्षेप करत तुम्ही आम्हाला व्यक्तिगत बोला. महाराष्ट्रीयन माणसांचा अपमान करू नका, असे शुक्लाला बजावले. यावर शुक्ला याने तुमच्या मराठीपणाची हवा अर्ध्या तासात बाहेर काढतो, तुमचा मर्डरच करतो, अशी धमकी देऊन गुंड टोळीला फोन केला. यानंतर काही वेळातच आठ ते दहा गुंड हातात शस्त्रs घेऊन बिल्डिंगमध्ये आले. त्यांनी धीरज देशमुख, अभिजित देशमुख, विजय कळवीकट्टे यांना मारहाण केली. डोक्यात रॉड घालून अभिजित देशमुख यांचे डोके फोडले. तर शुक्ला याने माधुरी देशमुख यांचा विनयभंग केला. अर्धा तास गुंडांचा धुडघूस सुरू होता.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.