आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नागपूर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी सभागृहातून दिली महत्त्वाची माहिती

शरद लाटे  67   19-12-2024 17:35:35

नागपूर | Nagpur ::  महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मागील कार्यकाळात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजना आणण्यात आली आहे. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा देखील झाला. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. या योजनेचे लाभार्थी महिलांना जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हफ्ते देखील मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता पुढील हप्ता कधी जमा होणार? याकडे महिलांचे लक्ष लागून होते. त्यानंतर आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलतांना माहिती दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, राज्य सरकारने योजना सुरु करताना महिलांना दरमहा १५००रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील १५०० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील”, असे त्यांनी म्हटले. तसेच या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नसून आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 तुमची प्रतिक्रिया

 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.