आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नागपूर

तुकडेबंदी! १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे खरेदीखत चालू होणार मंत्रिमंडळाची मंजुरी

शिंदे राम   486   19-12-2024 17:28:42

नागपूर (Nagpur) :: तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्‍ये राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्‍या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दि‍ली.

मंत्रीमंडळाने दिलेल्‍या मान्‍यतेनुसार राज्‍यपालांच्‍या संमतीने १५ आक्‍टोंबर २०२४ रोजी अध्‍यादेशही काढण्‍यात आला होता. या अध्‍यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्‍यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्‍ये याबाबतचे विधेयक सादर केले. या विधेयकाला दोन्‍हीही सभागृहात मान्‍यता मिळाल्‍याने तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा मोठा दिलासा राज्‍यातील नागरीकांना मिळणार असून, याबाबत महसूल विभागाने माजी सनदी आधिकारी उमाकांत दांगट यांच्‍या नेमलेल्‍या समितीच्‍या शिफारसीही यासाठी विचारात घेण्‍यात आल्या आहेत.

सर्वसामान्‍य नागरीकांनी खरेदी केलेल्‍या १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्‍यास या निर्णयामुळे मोठी मदत होईल असा विश्‍वास विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला १० ऑक्‍टोंबर २०२४ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्‍यता घेऊन राज्यपालांच्या मान्यतेने 15/10/2024 अध्यादेश प्रसिध्द करण्यात आलेला होता. या अध्यादेशाचे आज विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रुपांतर झालेले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 लोकांच्या प्रतिक्रिया


PCMC तहलका
Kapil saware 19-12-2024 19:49:25

Mala 1 guntha pahije

PCMC तहलका
Amol jadhav 19-12-2024 19:53:58

Khup adachan hot aahe tukada bandi mule plese sarkar la vinnati aahe pleese kharedi khat chalu kara he upkar aamhi nahi visarnar


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.