Nagpur नागपूर प्रतिनिधी :: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने प्रचंड नाराज आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.
छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजित पवारांच्या फोटोला जोडेमार आंदोलन केले, आज त्यांनी समता परिषदेची बैठक बोलावली असून त्यामध्ये काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं गरजेचे ठरेल, पूर्वी महायुतीच्या आमदार सुहास कांदे (Sushas kande) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला ते नागपूर येथे म्हणाले की छगन भुजबळ हा बोगस माणूस आहे राजीनामा द्यायची त्याच्यात हिंमत नाही केवळ जाती जाती तेढ निर्माण करणे हेच काम चांगले तो करू शकतो, आज पक्षाने मंत्रीपदी वर्णी लावली नाही तर अजित पवारांच्या विरोधात गेले शरद पवार (SharadPawar) साहेबांनी एवढे देऊन त्यांच्या विरोधात गेले हा केवळ सत्तेसाठी व सत्तेतून पैसा कमावण्यासाठी राजकारणात जिवंत आहे राज्यातील सर्वात बोगस असणाऱ्या नेत्यापैकी छगन भुजबळ एक आहे अशी टीका आमदार सुहास कांदे यांनी केली.