आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पिंपरी -चिंचवड

Bhosari बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करावी आमदार महेश लांडगे आक्रमक

शिंदे राम   50   18-12-2024 14:49:38

चिंचवड प्रतिनिधी (Pimpri Chinchwad) :: पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांना त्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे (Mahesh lagdge) यांनी विधानसभेत केली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadnavis) यांनी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देऊन कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर (Nagpur)येथे सुरू आहे. यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आतापर्यंत बेकायदेशीरपणे शहरात वास्तव्य 70 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना त्‍यांच्‍या देशात परत पाठवले आहे. पश्चिम बंगालच्या सीमा भागातून बांगलादेशी भारतात प्रवेश करतात. बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट तयार करतात. रोजगाराच्या निमित्ताने आलेले हे बांगलादेशी देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.

पॅन कार्ड आधार कार्ड व डॉक्युमेंट बनवून देणाऱ्या लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे माणूस कुठला आहे काही समजत नाही मात्र हे डॉक्युमेंट बनवणारी टोळी देखील तेवढेच याला जबाबदार आहे त्यामुळे त्याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधानसभेत आज आमदार महेश दादा लांडगे (Mahesh lagdge )यांनी केली

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 तुमची प्रतिक्रिया

 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.