आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिंपरी चिंचवड मधे गुंठेवारी बांधकामांचे सर्वेक्षणच नाही

PCMC तहलका न्यूज  106230   24-12-2021 12:46:05

पिंपरी: गुंठेवारीतील बांधकामे नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिकेने संबंधितांकडून अर्ज मागविले आहेत. मात्र, शहरात नेमके किती बांधकामे ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची आहेत, याचा कोणताही सर्वे महापालिकेने केलेला नाही.

त्यामुळे मिळकतधारकांनी केलेल्या अर्जांची व त्यासोबतच्या कागदपत्रांची छाननी करून पात्र-अपात्र बांधकामे ठरवली जाणार आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिका हद्दीतील ३१ डिसेंबर २०२० पूर्वी झालेली गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी मिळकतधारकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे व दाखले जोडायची आहेत. (no survey of Gunthewari constructions in Pimpri Chinchwad)

Also Read: स्वच्छतेत अव्वल; कचरा प्रश्न जैसे थे!

त्याबाबतची माहिती महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नागरी सुविधा केंद्रांमार्फत किंवा ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहेत. मात्र, गुंठेवारीतील बांधकामांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण भिस्त नागरिकांकडून येणाऱ्या अर्जांवर अवलंबून आहे. मात्र, नियमानुसार, निळ्या पूररेषेखालील किंवा नदी पात्रातील, विकास आराखड्यातील आरक्षणे, रस्त्यांसाठीची आरक्षणे, रेड झोन, बफर झोन, शेती झोन वा हरित पट्टे, सरकारी जागेतील, नाल्यांच्या काठावरील, ना विकास झोनमधील व धोकादायक बांधकामे नियमित केली जाणार नाहीत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गुंठेवारीतील सर्वाधिक बांधकामे अशाच क्षेत्रांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसते. (Most of the constructions in Gunthewari are in such areas)

Also Read: बेळगाव :आयटीआयच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी लाच मागणारे एसीबीच्या जाळ्यात

  • अशी बांधकामे; अशी ठिकाणे
    -रेड झोन : दिघी भारतमाता नगर, मॅग्झीन कॉर्नर; भोसरी चक्रपाणी वसाहत; वडमुखवाडी लांडगेनगर; चिखली साने वस्ती काही भाग, म्हेत्रे वस्ती; तळवडे त्रिवेणीनगर, रुपीनगर
    - बफर झोन : मोशी तापकीरनगर, खान्देशनगर, कचरा डेपो संरक्षक भिंतीलगतचा भाग
    - हरित पट्टे : मोशीचा काही भाग
    - नदी, नाले, पूररेषा : शहरात सुमारे १८ मोठे नाले आहेत. त्यांच्यासह नदी पात्रालगतच्या जमिनी गुंठवारीने विकल्या आहेत. इंद्रायणी व पवना नदीच्या पात्रापर्यंत बांधकामे झाली आहेत. उदाहरणार्थ वाल्हेकरवाडी, काळेवाडी, चिंचवड परिसर
    - आरक्षणे : शाळा, रस्ते, बहुउद्देशीय सभागृह, समाज मंदिरे, बेघरांसाठी घरे अशा विविध कारणांसाठी आरक्षणे आहेत. मात्र, बहुतांश बांधकामे अद्याप महापालिकेच्या ताब्यात नाहीत. मुळ जागा मालकांनी गुंठेवारीने जागा विकल्याने त्याठिकाणी पक्की बांधकामे झाली आहेत. उदाहरणार्थ कासारवाडी, चिखली.

''गुंठेवारीनिहाय बांधकामांचे सर्वेक्षण झालेले नाही. मात्र, अशी बांधकामे नियमितीकरणासाठी नागरिकांकडून आलेल्या अर्जांची, त्यांची कागदपत्रे व आवश्यक दाखल्यांची छाननी केली जाईल. मिळकतकर भरला आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाईल. त्यानुसार, नियमितीकरणासाठी पात्र-अपात्र ठरविले जाईल.''
मकरंद निकम, सहशहर अभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, महापालिका


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.