सामाजिक संघटनांनी पुढे येऊन काम करावे : ज्ञानेश्वर कटके यांचे आव्हान
PCMC तहलका न्यूज
270738
23-04-2021 03:02:02
वाघोली प्रतिनिधी : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस संपूर्ण देशभर व महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात पसरत आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण आहे, मात्र माणुसकी म्हणून आपण जर रस्त्यावर उतरलो तर निश्चित त्यांना खूप मोठी मदत होऊ शकते यामुळे शिवसैनिक आता घरोघरी जाऊन तसं काम करत आहेत, मात्र सर्वपक्षीय व सामाजिक संस्थांनी गणेश मंडळांनी, गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता घरोघरी जाऊन कोरोणाच्या व्हॅक्सिंन बद्दल लोकांना माहिती देऊन त्यांना राज्य शासनाने दिलेल्या व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रावर लस करून घ्यावी,
यासाठी संघटनेने पुढे यावे, अशी वेळ खऱ्या अर्थाने आली आहे,
यामुळे निश्चितच कोरोना चा प्रादुर्भाव कमी होईल यात मात्र कुठलीही शंका नाही मात्र हा काळ खूप कठीण आहे या पार्श्वभूमीवर काहीही करून मदत कार्य सुरू केले पाहिजे, त्यामुळे कोरोनाच्या प्रदुर्भाव आपल्याला आटोक्यात आणता येईल, व 45 वर्ष वरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी केले आहे.
आत्ताचा काळ खूप कठीण आहे व्हेंटिलेटर मिळत नाही आहे, ऑक्सिजनचा खूप मोट्या प्रमाणात तुटवडा आहे , त्यामुळे काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे आता असू शकतो त्यामुळे लसीकरण सुद्धा हा खूप मोठा पर्याय आहे त्यामुळे सर्व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन कटके यांनी केले