Pune जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर सध्या कमालीची अस्वस्थता पसरली असून, आगामी काळात जगाला एका अत्यंत भीषण आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा धक्कादायक इशारा एका आघाडीच्या जागतिक तज्ज्ञाने दिला आहे.
सध्याची भू-राजकीय परिस्थिती, महागाई आणि बाजारातील अनिश्चितता पाहता, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये धोक्यात आले असून एका अत्यंत मोठ्या आर्थिक बदलाची सुरुवात झाली असल्याचे संकेत मिळत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीची साधने पूर्णपणे कोलमडून पडतील आणि बाजारात अशी काही अभूतपूर्व उलथापालथ होईल. ज्यामुळे सर्वसामान्यांपासून ते बड्या उद्योगपतींपर्यंत सगळ्यांचीच झोप उडणार आहे. या येऊ घातलेल्या महाभयंकर संकटातून स्वतःला कसे वाचवायचे आणि नेमका कोणता धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे,
'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जागतिक शेअर बाजाराबाबत मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच जागतिक बाजारात मोठी घसरण होऊ शकते आणि त्याचवेळी सोने व चांदीच्या किमतींमध्ये स्फोटक वाढ पाहायला मिळू शकते.
पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये फ्लॅटच्या किमती गगनाला भेटले आहेत अशातच फ्लॅट रद्द करून पैसे जवळ ठेवा त्याची सोन्यात इन्व्हेस्टमेंट केल्यास खूप मोठा फायदा होईल असे अर्थतज्ञ सांगत आहेत
कियोसाकी यांनी प्रसिद्ध मार्केट स्ट्रॅटेजिस्ट जिम रिकर्ड्स यांचा हवाला देत म्हटले की, रिकर्ड्स यांच्या मते भविष्यात सोन्याची किंमत 1 लाख डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. सध्या सोन्याचा भाव सुमारे 4,500 डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे. तर स्वतः कियोसाकी यांनी अंदाज व्यक्त केला की, चांदीची किंमत भविष्यात 200 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. सध्या चांदीचा दर सुमारे 75 डॉलर प्रति औंस आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये कियोसाकी यांनी लिहिले, मोठा क्रॅश येणार आहे. जिम रिकर्ड्स यांना वाटते की सोने 1,00,000 डॉलरपर्यंत जाईल. आज सोने 4,500 डॉलरवर आहे. माझ्या मते चांदी 200 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचेल. आज चांदी 75 डॉलरवर व्यवहार करत आहे.
कियोसाकी यांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा जगभरातील बाजार आधीच भू-राजकीय तणाव, सातत्याने वाढणारी महागाई, वाढते सरकारी कर्ज आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांबाबतच्या अनिश्चिततेमुळे दबावाखाली आहेत.
सध्या सोने सुमारे 4,500 डॉलर प्रति औंस तर चांदी 75 डॉलर प्रति औंसच्या आसपास व्यवहार करत आहे. सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांत या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. कियोसाकी यांच्या नव्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे की, जग एका मोठ्या आर्थिक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे का? भविष्यात गुंतवणूकदार पारंपरिक चलन आणि आर्थिक साधनांपासून दूर जाऊन सोने-चांदीसारख्या हार्ड अॅसेट्सकडे वळतील का, याबाबत र्चा रंगू लागली आहे.
कियोसाकी यांनी असेही म्हटले की, सर्वोत्तम गुंतवणूकदार भविष्यातील संकट आधीच ओळखतात आणि त्यानुसार निर्णय घेतात. लक्षात ठेवा, या क्रॅशचे बळी होण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली तर याच संकटातून तुम्ही श्रीमंतही बनू शकता.
रॉबर्ट कियोसाकी हे दीर्घकाळापासून सोने, चांदी आणि बिटकॉइनसारख्या वास्तविक मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे समर्थन करत आले आहेत. त्यांच्या मते केवळ कागदी चलन आणि पारंपरिक आर्थिक साधनांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते.
दरम्यान शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये कमजोरी दिसून आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढली असून अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.
स्पॉट गोल्डचा भाव 0.6 टक्क्यांनी घसरून 4,515.83 डॉलर प्रति औंसवर आला. व्यवहारादरम्यान यात 1 टक्क्यांपर्यंत घसरणही दिसून आली. या आठवड्यात आतापर्यंत सोन्याच्या किमती सुमारे 0.4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. जून डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी घसरून 4,523.20 डॉलर प्रति औंसवर बंद झाले.
दुसरीकडे स्पॉट सिल्व्हरमध्ये 1.1 टक्क्यांची घसरण झाली आणि चांदीचा भाव 75.85 डॉलर प्रति औंसवर आला.
जागतिक बाजार सध्या अस्थिर तेलकिमती, भू-राजकीय तणाव आणि मंदावणाऱ्या आर्थिक वाढीच्या भीतीशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. जगभरातील केंद्रीय बँकाही गेल्या काही वर्षांत डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्यामुळे सोन्यावरील तेजीचा माहोल आणखी मजबूत होत आहे.
चांदीबाबत गुंतवणूकदारांचा कल वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिचा औद्योगिक वापर. चांदीचा वापर केवळ मौल्यवान धातू म्हणून नाही, तर सोलर एनर्जी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे भविष्यात चांदीची मागणी आणखी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.