Pcmc news
भाजपने धक्कातंत्र अवलंबित पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सात चेहऱ्यांना संधी दिली आहे. सात महिलांना स्थायी समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे आणि संदीप कस्पटे यांच्यात चुरस असणार आहे.
महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी भाजपच्या, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी शिवसेनेच्या सदस्यांची नावे बंद पाकीटातून महापौर लांडगे यांच्याकडे दिली. या नावांची घोषणा महापौर लांडगे यांनी केली. शिवसेनेला केवळ स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. विषय समित्यांचे सदस्यत्व मिळाले नाही.
स्थायी समितीचे सदस्य
अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन (भाजप), सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुलभा उबाळे (शिवसेना)
विधी समिती
ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम (भाजप), शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शहर सुधारण समिती
अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे (भाजप) डॉ. वैशाली घोडेकर, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे (भाजप), भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिक्षण समिती
पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना अंघोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे (भाजप), प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस)
महिला व बालकल्याण समिती
पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे (भाजप), निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बारणे-कस्पटे यांच्यात चुरस
भाजपने दुसऱ्यांदा निवडून आलेले अभिषेक बारणे, संदीप कस्पटे, योगिता नागरगोजे आणि बाबासाहेब त्रिभुवन यांना स्थायी समितीमध्ये संधी दिली आहे. त्यापैकी अध्यक्षपदासाठी बारणे आणि कस्पटे यांच्यात चुरस असणार आहे.